logo

शेती उत्पादक कंपनी (FARMER PRODUCER COMPANY)

सन १९५६ च्या कंपनी कायद्यात बदल करुन त्यातील कलम ९-अ मधे शेती उत्पादक कंपनी (FARMER PRODUCER COMPANY) बाबतीत कायदा, नियमावली देण्यात आलेली आहे. कंपनी कायदा २०१३ मधिल सेक्शन ४६५ (१) मधे सध्या ते आपणास बघावयास मिळेल.

या कंपनी मुळे शेतक-यांना काय फायदे होतील ते आपण या सदरात जाणुन घेणार आहोत. ह्या कंपनी कायद्याच्या अंतर्गत शेतकरी काय काय लाभ मिळवु शकतो ते देखिल आपण बघणार आहोत, तसेच त्यांस अनुसरुन इतर काही योजना कशा लाभकारक ठरतील ते देखिल बघणार आहोत.

शेती उत्पादक कंपनी (FARMER PRODUCER COMPANY) कायद्या अंतर्गत शेतकरी काय काय करु शकतात

उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग (एका ठिकाणी जमा करणे), हातळणी, विपणन (मार्केटिंग)(Marketing), विक्रि, निर्यात – कंपनी सभासद सदस्य यांचे व्दारा , वस्तु किंवा सेवा आयात करुन निर्माण झालेल्या उत्पादनाचे.

म्हणजेच कंपनी सभासद सदस्य यांनी उत्पादन केलेल्या किंवा कंपनीने त्यासाठी आयात केलेल्या अशा उत्पादनाचे उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग, हातळणी, विपणन, विक्री आणि निर्यात करु शकतात. तसेच कंपनी ह्या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरिल एखाद्या संस्थे कडुन करुन घेवु शकतात.

याठिकाणी आपण हरभरा आणि सोयाबीन या पिकांचे उदाहरण घेणार आहोत

    उत्पादन (Production)- समजा एखाद्या कंपनीच्या १० सभासदांनी १०० एकर हरभरा आणि सोयाबीन ची लागवड केली आहे.

    हार्वेस्टिंग (Harvesting)– कंपनी स्व-खर्चाने किंवा शेतकरी स्व-खर्चाने कंपनी व्दारा दिलेल्या हार्वेस्टर ने मालाची काढणी करेल.

    प्रोक्युरमेंट (Procurement)- कंपनी ह्या सभासदांकडुन एका ठरावीक दराने हरभरा आणि सोयाबीन खरेदी करेल

    पुलिंग, ग्रेडिंग (Grading)– कंपनी सर्व माल एका ठिकाणी जमा करुन त्या मालाची ग्रेडिंग करेल. तसेच कंपनी या मालावर प्रोसेसिंग देखिल करु शकेल. समजा, हरभरा पासुन ग्रेडिंग केलेला हरभरा, डाळ, आणि बेसन निर्माण केले, तर सोयाबीन पासुन ग्रेडिंग केलेला सोयाबीन, तेल तसेच इतर पदार्थ तयार करेल.

    विपणन, विक्रि (Distribution and Sales) – कंपनी या मालाची विक्री करेल.

    या विक्रीतुन येणारा नफा पुन्हा शेतकरी वाटुन घेतील.

    याठिकाणी जर कंपनीचा कारभार हा दुरदृष्टी आणि सक्षम हातात असेल तर ती कंपनी परिसरातुन भरपुर प्रमाणावर खरेदी करु शकेल.

    शेतक-यांचा माल हा चांगल्या दराने, दलाली, हमाली, वराई, आडत, कमिशन, ट्रान्सपोर्ट यांच्या शिवाय खरेदि केला जाईल, यात ते हवा तो दर त्यांना मिळु शकतो (अर्थात बाजारात प्रोसेंसिंग केलेल्या मालाचा दर कसा ठेवतात यावर खरेदि दर अवलंबुन असतील)

    मालावर प्रक्रिया होवुन जो काही नफा (Profit) राहील त्यात देखिल वाटा राहील.

    जर कंपनी ला वाटते, कि, शेतक-यांना ३-४ महिने शेती वापरण्याचे भाडे म्हणुन २-३ हजार रुपये देखिल द्यायचे (अर्थात हे कंपनी व्यवस्थापन (Company Management) ठरवणार आहे आणि कंपनी कडे किती खेळते भांडवल राहते त्यावरुन ते ठरेल) तर कंपनी ते देवु शकते.

    शेतकरी जमिनीचे भाडे (ऐच्छिक), मालाचा चांगला दर, प्रक्रिया केल्यानंतर विक्री होवुन मिळणारा नफा, प्रक्रिया केंद्रात गावातील तरुणांना रोजगार, विक्री साठी रोजगार, तसेच वाहतुकीचा रोजगार हे सर्व फायदे मिळवु शकतात.

    प्रक्रिया उद्योगाची सबसिडी, बँके कडुन कर्ज तसेच इतर फायदे मिळतील. यात पिक लागवडीसाठी कर्जासाठी सहकारी क्षेत्रातुन होणारे कर्ज वाटप यातुन मिळालेले कर्ज जास्त योग्य ठरेल. केवळ कंपनी च्या प्रक्रिया आणि खेळते भांडवल यासाठी बँकांकडुन कर्ज घेणे जास्त योग्य ठरेल.

नाबार्ड शेती उत्पादनांच्या (Farm Produce) प्रक्रिया उद्योगासाठी (Process Industry) कमी व्याज दराने (सहसा १० टक्के असतो) अर्थ सहाय्य करते.

आपल्या परिसरात जर शासनाने फुड पार्क किंवा मेगा फुड पार्क स्थापन केले असेल तर त्याठिकाणी शेती उत्पादक कंपनीची निर्माण व्यवस्था असावी लागते. हे फुड पार्क (Food Park) फळ प्रक्रिया मंत्रालय, केंद्र शासन. मेगा फुड पार्क, फळ प्रक्रिया मंत्रालय, केंद्र शासन. राज्या शासनाने निर्देशित केलेले फळ प्रक्रिया उद्योग पार्क, SEZs ज्यात फळ प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे, आणि केंद्र शासनाव्दारा निर्देशीत इतर फुड पार्क येथे जागा असावी लागते.

या योजनेत नाबार्ड (NABARD) एकुण खर्चाच्या ७५ टक्के कर्ज उपलब्ध करुन देते.

या योजनेत खालिल बाबींचा समावेश होतो

    फळे, भाजीपाला,मशरुम, प्लांटेशन पिके, आणि इतर फळ पिके

    दुध आणि दुग्ध जन्य पदार्थ

    कोंबडी आणि इतर मांस

    मासे व इतर समुद्री प्राणी

    कडधान्य, तृणधान्य, तेलबीया

    औषधी वनस्पती, जंगलापासुन निर्मित वनौऔषधी

    कंज्युमर फुड प्रोडक्ट जसे बेकरी, कफ्नेश्कनरी इ.

    इतर रेडी टु ईट उत्पादने

    कार्बोनेटेड ड्रिंक्स, नॉन अल्कोहोलिक बिव्हेरेजेस, एनर्जी ड्रिंक, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, सॉफ्ट ड्रिंक इ.

    फुट फ्लेवर्स, फुड कलर्स, मसाले, इ.

    हेल्थ फुड, हेल्थ ड्रिंक्स इ.

    आणि इतर सर्व प्रकल्प जे केंद्र शासन फळ प्रक्रिया म्हणुन मान्यता देते.

कंपनी (Farmer Producer Company) कशी स्थापन कराल?

    कमीत कमी १० किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी ज्यांची वास्तविक शेती आहे, किंवा २ आणि त्यापेक्षा जास्त संस्था ज्या वास्तवीक शेती उत्पादन करतात किंवा यांचा १० किंवा त्यापेक्षा जास्तीचा समुह जो या कायद्याच्या कलम ५८१ ब मधे निर्देशित केलेल्या कृतींसाठी एकत्र येवुन कंपनी कायद्या अंतर्गत शेती उत्पादक कंपनी स्थापन करु शकतो.

    जर कंपनी रजिस्टार यांचे कायद्याच्या पालनाबाबत समाधान झाले तर अर्ज दाखल केल्यानंतर ३० दिवसांत कंपनी स्थापन केल्याची पुर्तता झाल्याचा दाखला मिळतो, म्हणजेच कंपनी स्थापन होते.

    अशा कंपनीच्या सभासदांचे दायित्व (liability) हि कंपनीच्या मेमोरँडम मधे निर्देशित केल्यानुसार त्यांनी गुतवलेल्या शेअर कॅपिटल इतकी मर्यादित राहते, पेड किंवा अनपेड शेअर कॅपिटल.

    अशा प्रकारे स्थापन कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा दर्जा प्राप्त होतो, तसेच हि कंपनी कधीच पब्लिक लिमिटेड कंपनी बनु शकत नाही, किंवा त्यात रुपांतरीत होवु शकत नाही.

कंपनी (Farmer Producer Company) कशा पध्दतीने कार्य करेल

    कंपनी स्थापन करित असतांना ज्या सभासदांना घेवुन ती स्थापन झालेली आहे त्यातुन किंवा बाहेरुन कंपनी एक सी.ई.ओ. (चिफ एक्सिक्युटेव्ह ऑफिसर) ची नेमणुक करतात.

    कंपनीसाठी सभासदांतुन एक चेअरमन ची नेमणुक करता येते.

    कंपनी कशा प्रकारे कार्य करेल याची रुपरेषा हि कंपनीच्या आर्टिकल्स आणि मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन मधे नमुद केलेले असावे. याच्या विरोधात जावुन कार्य केल्यास तसे करणा-या पदाधिका-यास किंवा सभासदास शिक्षेची तरतुद कायद्यात तर आहेच पण तशी तरतुद आर्किटक्स आणि मेमोरॅन्डम मधे देखिल करुन ठेवावी.

    कंपनी च्या नफ्यापैकि काही भाग का कायद्याने कंपनी प्रशासनाने रिझर्व म्हणुन काढुन ठेवणे गरजेचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही शिल्लक राहील ते कंपनीच्या मिटिंग मधे आणि नियमावलीत नमुद केल्याप्रमाणे तसेच कंपनी कायद्याच्या आधीन राहुन सभासदात शेअर च्या किंवा डिविडंट च्या रुपात वाटता येते.

    कंपनी तिच्या सभासदांना आर्थिक कर्ज देखिल देवु शकते मात्र ते केवळ ६ महिने मुदतीचे असावे लागते.

    कंपनी चे अंतर्गत लेखापरिक्षण हे मान्यताप्राप्त चार्टड अकाउंटट कडुन करुन घेणे गरजेचे असते.

    जे कार्य करणारे सभासद असतात त्यांना काही विशेषाधिकार देखिल कंपनी प्रशासन प्रदान करु शकते.

    कंपनीचे शेअर हे ट्रान्सफरेबल नसतात, सभासदाने सभासद होतांनाच तिन महिन्याच्या आत, सभासदाच्या मृत्युनंतर कोणास त्याचे सभासदत्व ट्रान्सफर होईल हे कळवणे गरजेचे असते.

    कंपनी बोर्डाने वर्षातुन एकदा जनरल मिटिंग घेणे बंधनकारक आहे, त्यामिटिंग ची वेळ ठिकण आणि इतर बाबी सभासदांना कळवणे बंधनकारक आहे. बोर्ड मिटिंग साठी कोरम हा एकुण सभासद संख्येच्या एक त्रित्युआंश जो कमीत कमी ३ असावा.

    ज्या कंपनीचा सतत तिन वर्ष ५ करोड पेक्षा जास्त टर्नओव्हर होतो त्या कंपनीस पुर्णवेळ कंपनी सेक्रेटरी ठेवणे गरजेचे आहे. असा मनुष्य हा इंस्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया चा सभासद असणे बंधनकारक आहे.

    कंपनीत किमान ५ तर जास्तीत जास्त १५ डायरेक्टर असावेत. जे कंपनीच्या मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन वर सही करतील ते डायरेक्टर असतात.

आपण शेती उत्पादनक कंपनी स्थापने संबंधात माहीती घेतली. हि कंपनी शेतकरी मिळुनच स्थापन करु शकतात. कंपनी स्थापने साठी सक्षम अशा चार्टड अकाउंटट (Chartered Accountant) कडे संपर्क साधावा.

हि शेती उत्पादनक कंपनी स्थापन केल्यानंतर प्रामुख्याने खालिल फायदे मिळतील.

    तृणधान्ये, कडधान्ये व इतर शेती उत्पादने (गहु, ज्वारी, बाजरी, डाळी,शेंगदाणे वै.) शेतकरी ग्रेडिंग करुन पॅकिंग करुन सरळ मार्केट मधे विकु शकतील.

    शेतकरी स्वतःच उत्पादनावर प्रक्रिया करु शकतील.

    नाबार्ड (NABARD - National Bank for Agriculture and Rural Development) च्या विशेष योजनेच्या व्यतिरिक्त देखिल अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ मिळु शकतो.

    शहरातील आपलेच भाउबंध यांना सरळ शेतक-यांकडुन माल मिळेल. आज मोठ्या मोठ्या कंपन्या टि व्ही वरिल जाहीरातीत देखिल हाच दावा करतात कि, आमचे उत्पादन आम्ही सरळ शेतकरी कडुन घेतो.

    यात प्रस्थापित व्यापारी स्पर्धा करु शकतात, पण एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणुन या कंपनीस सहानुभुती आणि दर्जाची खात्री असल्याचा नैसर्गिक फायदा मिळेल.

    कंपनी स्वतः देखिल माल सरळ गिर्हाईकांस विकु शकते.

    आपण जी तक्रार कायम करत आलेलो आहोत कि शेतकरी त्यांच्या मालाचा भाव स्वतः ठरवु शकत नाहीत, ती तक्रार कायम स्वरुपी बंद होईल.

    गावातच रोजगार निर्माण होईल. नैसर्गिक आपत्तीपासुन येणारे संकट कमी होईल, कारण जरी सभासद सदस्यांकडे काही पिकले नाही तरी बाहेरुन आणुन त्यावर प्रक्रिया करुन उद्योग आणि रोजगार सुरु राहील.

    शेतीतील अनिश्चितता बर-याच अंशी कमी होण्यात मदत होईल.

    शेतीला उद्यागाच दर्जा या व्दारे मिळालेलाच आहे, गरज आहे ती केवळ त्याचा फायदा करुन घेण्याची.

    सर्वात आधी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि, शेतकरी जे पिकवतो ते खाल्या शिवाय जग जगु शकत नाही. त्यामुळे जगाची चावी आपल्या हातात आहे हि जाण असणे गरजेचे आहे, सरळ उत्पादक आता गिर्हाईकाशी बोलणार असल्याने त्यावेळेस हे असे सत्य मनात ठेवुन सर्व मार्केटिंग, जाहीराती वै डिझाईन करता येतिल.

IMP Links for Farmer Producer Company