टोमॅटो फुल-फळधारणेवर तापमाचा परिणाम
टोमॅटो फुल-फळधारणेवर तापमाचा परिणाम

टोमॅटो फुल-फळधारणेवर तापमाचा परिणाम

टोमॅटो फुल-फळधारणेवर तापमाचा परिणाम
टोमॅटो फुल-फळधारणेवर तापमाचा परिणाम

टोमॅटो हे तापमान-संवेदनशील पीक असून त्याच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी विशिष्ट तापमान श्रेणी आवश्यक असते. 21-25 °C हे टोमॅटोच्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी आदर्श तापमान मानले जाते. परंतु, 27 °C च्या वर तापमान गेल्यास किंवा 16 °C च्या खाली गेल्यास टोमॅटोच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

१. उष्णतेमुळे टोमॅटोच्या फुलण्यावर होणारा परिणाम:

फुलांच्या संख्येत घट – उच्च तापमानामुळे (30 °C च्या वर) फुलधारणा कमी होते.

फुलांची कमकुवत रचना – तापमान वाढल्यास फुलांचे अवयव (केसर आणि किंजपुट) लहान आणि अशक्त राहतात.

फुलांची गळती वाढणे – 32-35 °C तापमानाच्या सान्निध्यात फुलगळ अधिक प्रमाणात होते, विशेषतः पेडीकल पिवळी पडते व नंतर गळते.

परागधारणेवर परिणाम – जास्त तापमानात परागकणांची निर्मिती व जीवनक्षमतेत घट होते.

२. परागण आणि फळधारणेवर उष्णतेचा परिणाम:

परागण प्रक्रिया 25 °C च्या वर तापमान गेल्यास प्रभावित होते.

टोमॅटोमध्ये परागण साधारणतः सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत होते. 39-40 °C तापमान 2 दिवसांहून जास्त राहिल्यास परागधारणेवर प्रतिकूल परिणाम होतो.

रात्रौ 21 °C पेक्षा अधिक तापमान असेल तर पराग नलिकेची वाढ थांबते आणि परिणामी फळधारणा होत नाही.

३. आर्द्रतेमुळे होणारा प्रभाव:

80% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास पराग सहज पसरत नाही किंवा परागकण चिकटून राहतात, परिणामी परागण योग्य प्रकारे होत नाही.

परिणामी, लहान आकाराची फळे तयार होतात आणि त्यातील बियांची संख्या कमी राहते.

अति आर्द्रतेमुळे टोमॅटो फळांच्या आतील जेलचा विकास नीट होत नाही, त्यामुळे फळ मऊ वाटते आणि आतील पोकळ्या तयार होतात.

४. उच्च तापमान आणि फळांची गुणवत्ता:

लायकोपीन उत्पादनावर परिणाम – लायकोपीन रंगद्रव्य तयार होण्यासाठी 16-26 °C तापमान आदर्श आहे. परंतु, 27 °C च्या वर तापमान गेल्यास लायकोपीनची निर्मिती कमी होते आणि 40 °C तापमानात ते पूर्णतः नष्ट होते.

आंतरश्वेतता (Internal Whitening) – उच्च तापमानात फळांच्या आतील पेशींमध्ये पांढऱ्या भागांचे प्रमाण वाढते. तसेच, कमी पोटॅशियम उपलब्ध असेल तर हा प्रभाव अधिक तीव्र होतो.

फळांचे मऊसरपणा आणि विकृती – जास्त तापमानात फळांची वाढ असंतुलित होते, परिणामी फळांना कोपरे असलेले विकृत स्वरूप येते

५. उष्णतेच्या प्रभावामुळे फुलधारणेपासून फळ पक्वतेपर्यंत होणारा विलंब:

उच्च तापमानात झाडाचा वाढदर सामान्य पेक्षा दुप्पट असतो, ज्यामुळे झाडाची उंची जास्त होते पण खोड व फांद्या सडपातळ राहतात.

उच्च तापमानात फुले 30 दिवसांत दिसू लागतात, तर सामान्य तापमानात याला 42 दिवस लागतात.

फुलधारणा आणि फळधारणा यामध्ये विलंब होत असल्याने उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.

६. उत्पादन व व्यवस्थापन:

सिंचनाचा योग्य वापर – उष्णतेच्या ताणाखाली झाडांना पुरेसा ओलावा मिळाला पाहिजे. ठिबक सिंचन प्रभावी ठरते.

उष्णतेस सहनशील जातींची निवड – उष्णतेच्या प्रतिकूल परिणामांना सहन करणाऱ्या जाती निवडाव्यात.

छत्रछाया व्यवस्थापन – 30-40% छत्रछाया जाळी (shade nets) वापरल्यास उष्णता ताण कमी होतो आणि परागधारणा सुधारते.

पोषक तत्त्व व्यवस्थापन – पोटॅशियमच्या योग्य प्रमाणाने आंतरश्वेतता कमी करता येते आणि फळांचा दर्जा सुधारतो

निष्कर्ष:

टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी 21-25 °C हे तापमान योग्य आहे, परंतु 27 °C च्या वर तापमान गेल्यास उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही घटते. परागधारणेपासून फळधारणेपर्यंत उष्णतेचा मोठा प्रभाव दिसून येतो. उच्च

तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी योग्य व्यवस्थापन उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Blog

Explore Our Blog

Weather Station

1 month ago

Weather Station

1 month ago

टोमॅटो फुल-फळधारणेवर तापमाचा परिणाम

3 months ago

उन्हाळ्यात पिकांवरील किड नियंत्रण – प्रभावी उपाय आणि तंत्रज्ञान

4 months ago

Higher Temperature Suitable for Pesticide Spraying

4 months ago

उन्हाळ्यात कीड नियंत्रणासाठी प्रभावी फवारणी कशी करावी?

4 months ago

About Us

Welcome to Agriplaza

Welcome to Agriplaza. India's first and only comprehensive digital platform dedicated to agriculture and farmers. Explore widest range of related data our figures speaks a lot.

340552

Visitors

239

Diseases

131

Pests

Explore More

Data Driven Agriculture

Explore With Agriplaza